History

 
12


                                                                                                                                         

 अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ, (रजि.) पुणे

शाखा : कल्याण डोंबिवली महानगरपालिका
 

कल्याण शाखेचा पुर्व-ईतिहास ( संक्षिप्त स्वरुपात )

काही वर्षांपुर्वी कल्याण परिसरातील भोई समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन काही सामाजिक उद्दिष्ट्ये ठरवून, परिसरातील समाज बांधवांचे संघठन करायचे ठरले. सुमारे 1998 पासून कार्यकर्त्यांनी अनेक बैठका घेउन व समाज बांधवांच्या घरोघरी जाउन जनजागृती केली व परिवारांची माहिती भरुन घेतली व ती माहिती पुस्तक रुपाने आणायचे ठरविण्यात आले. 2000 साली कल्याण शाखा अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ (रजि) या संस्थेशी संलग्न करुन दि. 20 ऑगष्ट 2000 रोजी कल्याण भोई समाज शाखेचा पहिला परिचय मेळावा मराठा समाज मंदिर कार्यालय येथे आयोजित केला व कल्याण शाखेचे उदघाटन तत्कालिन कोकण विभागिय अध्यक्ष श्री चंद्रकांत नलावडे यांच्या शुभ हस्ते झाले.

या परिचय मेळाव्यात मान्यवरांनी कल्याण शाखेला मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कल्याण शाखेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱयांची व सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली ती खालीलप्रमाणे

पदाधिकारी

 • अध्यक्ष      : श्री बापूसाहेब नुक्ते 
 • उपाध्यक्ष    : श्री मधुकर रामोळे
 • सचिव       : श्री रमेश तमखाने
 • कोषाध्यक्ष   : श्री रतन मोरे


कार्यकारिणी सदस्य

 • श्री वि. ला. ढोले
 • श्री भिकन वाडिले
 • श्री सुरेश तारु
 • श्री पांडुरंग काटकर
 • श्री रामचंद्र धारपवार
 • श्री भगवान साठे
 • श्री वसंत साटोटे
 • श्री चंद्र्शेखर करंजे
 • श्री युवराज बोरसे
 • श्री पी. सी. मोरे
 • श्री व्हि. के. मोरे
 • श्री पंढरीनाथ भोकरे
 • श्री पी. डी. मोरे
 • श्री नाना मनुकर
 • श्री डि. एल. ढोले


महिला आघाडी कार्यकारिणी

 • अध्यक्ष       : सौ लता पडाळ
 • उपाध्यक्ष     : कु छाया भोकरे
 • सचिव        : सौ सुवर्णा मोरे
 • कोषाध्यक्ष   : सौ अंजना शिवदे


या परिचय मेळाव्यात मान्यवरांनी मार्गदर्शन करुन कल्याण शाखेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण केले व नंतर उपस्थित समाज बांधवांनी प्रत्येकाने स्वत:चा व कुटूंबियांचा परिचय करुन दिला. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.- असा संपन्न झाला कल्याण शाखेचा परिचय मेळावा.

यानंतर कार्यकारिणी सदस्यांनी मोठया उत्साहाने सामाजिक कार्यात भाग घेतला. कुटुंबांतील सदस्यांची माहिती जमा करुन स्मरणिका छापून तयार केल्या. परिसरातील प्रत्येक कुटूंबियांच्या सुखदु:खात भाग घेतला.

27 जानेवारी 2001 रोजी कल्याण शाखेचा, सामाजिक बांधिलकी हा कार्यक्रम मराठा मंदिर कार्यालयात संपन्न झाला. त्यात सामाजिक बांधिलकी 2000 या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात कल्याण परिसरातील सर्व कुटुंबांची माहिती प्रकाशित केली. याच दिवशी महिला आघाडीची स्थापना केली. महिला आघाडीची उद्दीष्ट्ये निश्चित करण्यात आली. मकर संक्रांतीचा सण असल्याने, या मेळाव्यात महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम अतिशय जिव्हाळ्याने पार पडला.

तिसरा मेळावा, दि. 19 ऑगष्ट 2001 रोजी, मराठा मंदिर कार्यालय येथे अ.म.भोई समाज सेवा संघाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वर्धापन दिनानिमीत्त प्रास्ताविक झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी 2001 या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कल्याण शाखेच्या परिसरातील 10वी, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस उपस्थित असलेल्या कल्याण शाखेबाहेरच्या समाज बांधवांनी अशी सुचना केली की कुटुंबाची माहिती कल्याणपर्यंत मर्यादित न ठेवता, डोंबिवली, उलहासनगर, अंबरनाथ, बदलापूर व लगतच्या परिसरा पर्यंत व्याप्ती वाढवून कुटुंबांची माहिती घ्यावी. ही गोष्ट शाखेच्या कार्यकर्त्यांनी मान्य करुन त्या त्या परिसरासाठी कार्यकर्त्याची नेमणूक केली व कुटूंबांची माहितीचे फ़ॉर्म भरुन आणायला सांगितले. व पुढच्या 2002 च्या होणारऱया मेळाव्यात स्मरणिका प्रसिद्ध करण्याचे ठरवण्यात आले.          तसेच कल्याण शाखेअंतर्गत महिला आघाडीतील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढील वाटचाली बद्दल विचार विनिमय केला.असा हा वर्धापन दिन समस्त समाज बांधवांच्या उत्स्फ़ुर्त प्रतिसाधामुळे अतिशय उत्साहात पार पडला.

सन 2001 मध्ये कार्यकारिणी, पदाधिकाऱयांचे (आधी ठरल्या प्रमाणे) काही प्रमाणात खांदेपालट करण्यात आले ते खालील प्रमाणे

पदाधिकारी

 • अध्यक्ष           : श्री बापूसाहेब नुक्ते 
 • उपाध्यक्ष        : श्री वि. ला. ढोले
 • सचिव        : श्री दिलीप महाकाळ
 • कोषाध्यक्ष    : श्री रतन मोरे


कार्यकारिणी सदस्य

 • श्री मधुकर रामोळे
 • श्री सतिष शिवदे
 • श्री रामचंद्र धारपवार
 • श्री पी. डी. मोरे
 • श्री व्हि. के. मोरे
 • श्री डि. एल. ढोले
 • श्री अर्जुन शिवदे
 • श्री सुरेश तारु
 • श्री भिकन वाडिले
 • श्री वसंत साटोटे
 • श्री चंद्रशेखर करंजे
 • श्री पंढरीनाथ भोकरे
 • श्री एन. बी. रामोळे
 • श्री पी. सी. मोरे
 • श्री शरद शिवदे
 • श्री वासुदेव गारपवार
 • कु. प्रशांत मोरे


महिला आघाडी कार्यकारिणी

 • अध्यक्ष      : सौ लता पडाळ
 • उपाध्यक्ष    : कु छाया भोकरे
 • सचिव       : सौ सुवर्णा मोरे
 • कोषाध्यक्ष  : सौ अंजना शिवदे


कार्यकारिणी सदस्य  

 • सौ माधुरी तारु
 • सौ गीता मोरे
 • सौ तुळसा नुक्ते
 • सौ अलका  मोरे
 • सौ प्रियंका करंजे
 • सौ सुरेखा बनसोडे
 • सौ उषा शिवदे
 • सौ जान्हवी महाकाळ


यानंतर 8 सप्टेंबर 2002 रोजी मराठा समाज मंदिर कार्यालय येथे भोई समाज बांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास मध्यवर्ती शाखेचे पदाधिकारी व थोर कार्यकर्ते, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व ठाणे जिलहा परिसरातील समाज बांधव मोठया संखेने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करुन सामाजिक बांधिलकी 2002 या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यात जवळपास 300 कुटुंबांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

यानंतर शाखेचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेउन समाज बांधवांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. विद्द्यार्थ्यांना बक्षिस वाटप व विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

शेवटी प्रमुख पाहुण्यांनी कल्याण शाखेचे कार्य पाहुन सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

* संकलन : श्री मधुकर रामोळे, कल्याण *

   Go to Top